साई रिसॉर्ट पडणार; बांधकाम विभागाने निश्चित केली वेळ

रत्नागिरीः माजी मंत्री अनिल परब यांचं साई रिसॉर्ट पडणार, हे आता निश्चित झालेलं आहे. बांधकाम विभागाने यासंदर्भात जाहिरात दिलीय. हे रिसॉर्ट पाडण्याचा कालावधीदेखील निश्चित करण्यात आलेला आहे.अनिल परब यांचं रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे साई रिसॉर्ट आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या रिसॉर्टसंबंधी आक्षेप घेतलेले होते. पर्यावरणीय नियमांचा भंग केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे हे अनधिकृत असल्याचा दावा त्यांनी केलेला. परंतु अनिल परब यांनी हात झटकत हे रिसॉर्ट आपलं नसल्याचं सांगितलं होतं.



संबंधित विभागाने या रिसॉर्टची संपूर्ण चौकशी केल्यानंतर ते अनधिकृत ठरवलं आहे. आज चिपळूणच्या बांधकाम विभागाने स्थानिक वर्तमानपत्रातून जाहिरात देत रिसॉर्ट पाडण्याचा कालावधी तीन महिने ठेवण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे.या पाडकामाचं टेंडर बांधकाम विभागाकडून काढण्यात आलेलं आहे. यामध्ये इमारतीची भिंत, कंपाऊंड वॉल, पोचरस्ता, एनएक्सचे बांधकाम पाडायचे आहे. शिवाय जागेचंही सपाटीकरण करायचं आहे. याच कामाची माहिती या जाहिरातीमधून देण्यात आलेली आहे. कामाची अंदाजित रक्कम ४३ लाख २९ हजार ८ रुपये ठरवण्यात आलेली आहे. त्यामुळे हे रिसॉर्ट पडणार, हे निश्चित झालेलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने