आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारात तेजी, गुंतवणूकदारांमध्ये उत्साह

मुंबई: शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून अस्थिरता दिसून आली होती. आज आठवड्याच्या पहिल्या दिवसही अतिशय सकारात्मक वातावरण दिसून आले आहे. आज शेअर बाजारात सेन्सेक्स 569 अंकाच्या तेजीसह 60,529 वर सुरू झाला तर निफ्टी 169 अंकाच्या तेजीसह 17,956 वर सुरू झाला. (share market opening update 31 october 2022)



आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

शुक्रवारी बाजार सकारात्मक दिसून आल्याचे मेहता इक्विटीजचे प्रशांत तापसी म्हणाले. निफ्टीने 18000 ही पातळी ओलांडली तर यापुढील टारगेट त्याचा 18605 त्याचा ऑल टाईम हाय असेल. यूएस फेडने व्याजदरात 0.75 टक्के वाढ केल्याच्या शक्यतेचा बाजारावर कोणताही परिणाम झाला नाही. आता पहिला रझिस्टंस निफ्टीसाठी 18100 वर दिसत आहे तर 17407-17589 वर सपोर्ट दिसत आहे.

निफ्टी गेल्या आठवड्यात सप्टेंबरच्या संपूर्ण घसरणीच्या जवळपास 78.6 टक्के रिट्रेसमेंटवर फिरत राहिल्याचे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. त्याची की फिबोनाची (Key Fibonacci) 17800 च्या जवळ आहे. निफ्टीला पहिला सपोर्ट 17720-17700 वर आहे. हा सपोर्ट तुटल्यास निफ्टी शॉर्ट टर्ममध्ये 17500 च्या दिशेने जाऊ शकतो. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने