रात्री घरावर हल्ला, सकाळी सुरक्षा काढली; BJP विरोधी बोलणं जाधवांना भोवलं?

चिपळूण : शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या घरावर काल रात्री हल्ल्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या घराबाहेर काही संशयास्पद वस्तू आढळल्याने याबद्दल कळलं आहे. दरम्यान, आता त्यांची सुरक्षा काढून घेतल्याचीही माहिती मिळत आहे. भाजपा आणि शिंदे गटाविरोधात बोलणं त्यांना भोवलं की काय, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.



गेल्या दोन तीन दिवसांपासून भास्कर जाधव सातत्याने भाजपा आणि शिंदे गटाविरुद्ध भाषणं करत आहेत. त्यात राणे परिवाराशीही त्यांचा संघर्ष होत होता. त्यात त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर हा संघर्ष पेटला की काय अशी शंकाही उपस्थित होत होती. माजी खासदार निलेश राणे यांनी भाजपा कार्यकर्ता मेळाव्यामध्ये भास्कर जाधवांची नक्कल केली होती. तर त्याला उत्तर देताना कुडाळ जिल्ह्यातल्या मेळाव्यात टीकेला उत्तर देताना त्यांनी राणेंसह सगळ्या भाजपा नेत्यांवर टीका केली होती.या सगळ्यामध्येच भास्कर जाधव यांची सुरक्षा काढून घेतली असल्याची माहिती सामच्या सूत्रांनी दिली आहे. ते सातत्याने भाजपा विरोधात करत असलेल्या वक्तव्यांचेच हे पडसाद असल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे. रात्री हल्ला झाल्याची शंका असताना सकाळी सुरक्षा काढून घेतल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने