“हे तोंडाचं गटार…”, मोदींना ‘नीच व्यक्ती’ म्हटल्याने स्मृती इराणी संतापल्या, त्यांच्या ९९ वर्षीय आईचा उल्लेख करत केजरीवालांना सुनावलं.

 नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या नेत्याला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सुनावलं आहे. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु असताना स्मृती इराणी यांच्या ट्वीटमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. स्मृती इराणी यांनी आपचे नेते गोपाल इटालिया यांचा व्हिडीओ ट्वीट केला आहे, ज्यामध्ये ते ९९ वर्षीय हिराबेन मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत. यानंतर स्मृती इराणी यांनी संताप व्यक्त केला असून, येणाऱ्या निवडणुकीत पक्षाचा विनाश होईल असं म्हटलं आहे.

हा व्हिडीओ नेमका कधी शूट करण्यात आला आहे, हे समोर आलेलं नाही. दरम्यान ट्वीटमध्ये स्मृती इराणी यांनी अरविंद केजरीवाल यांचा उल्लेख करत म्हटलं आहे की “गटाराचं तोंड असणारे गोपाल इटालिया आता तुमच्या आशीर्वादाने हिरा बा यांना शिव्या देत आहेत”.


“मी आक्रोश करणार नाही. मला गुजराती किती नाराज आहेत हेदेखील दाखवण्याची गरज नाही. पण आता तुमचा निकाला लागला आहे आणि निवडणुकीत तुमच्या पक्षाचा निश्चित पराभव होईल. आता जनताच तुम्हाला न्याय देईल,” असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. दोन वर्षांपूर्वी गोपाल इटालिया यांनी आपचे संयोजक म्हणून निवड करण्यात आली होती. राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. २०१८ मधील व्हिडीओवरुन ही चौकशी होणार आहे. भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमिल मालविया यांनी रविवारी हा व्हिडीओ ट्वीट केला होता. यामध्ये गोपाल इटालिया नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘नीच व्यक्ती’ असा केला होता.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने