मनसेच्या आंदोलनाने स्टार स्पोर्ट वाल्यांची टरकली, अधिकारी पळत पळत राज ठाकरेच्या दरबारी.

मुंबई : वर्ल्ड कप सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. यापूर्वी कोणतीही विश्वचषक स्पर्धा मराठीमध्ये प्रक्षेपित झालेली आपण पाहिली नाही. पण यावर्षी होणारा विश्वचषक मात्र मराठीमध्ये प्रक्षेपित होणार आहे. कारण मराठी भाषेला दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीविरोधात धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेने याबाबत मोठे आंदोलन केले.


स्टार स्पोर्ट्स वाहिनीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर इतर भाषांप्रमाणेच मराठी भाषेतही प्रसारण व्हावे, असा अल्टिमेटम मनसेकडून देण्यात आला आहे. अन्यथा मनसे स्टार स्पोर्ट्स वाहिनीला आपल्या पद्धतीने धडा शिकवेल, असा इशारा राज ठाकरेंनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

स्टार स्पोर्टस ही वाहिनी क्रिकेटचा विश्वचषक प्रसारीत करीत आहे. महाराष्ट्रीत लाखो चाहते हा विश्वचषक पाहणार त्यामुळे अन्य प्रादेशिक भाषांमध्ये जर विश्वचषकाचे प्रसारण होत आहे, तर ते मराठीत का होऊ शकत नाही. स्टार स्पोर्ट्स मराठीला दुय्यम वागणून देत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर स्टार स्पोर्ट्सला जागं करण्यासाठी आंदोलन केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने