“भाजपाचा नी संवेदनशीलतेचा काय संबंध, त्यांनी माघार घेतली कारण…”; सुषमा अंधारेंची जोरदार टीका.

मुंबई :  अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, भाजपाच्या या निर्णयानंतर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. भाजपाचा आणि संवेदनशीलतेचा काहीही संबंध नसून पराभवाच्या भितीनेच त्यांनी माघार घेतली, असे त्या म्हणाल्या.



भाजपाने माघार घेतली म्हणजे भाजप पराभव दिसत होता. सर्व एजन्सीने भाजपा पराभूत होईल असे सांगितले होते. त्यामुळे माघार घेणे हा भाजपाकडून लावण्यात आलेला हा मुलामा आहे. भाजपाला जर संवेदनशील राजकारण आणि संस्कृती कशी जपायची हे माहिती असतं तर कोल्हापूर निवडणुकीत त्यांनी उमेवार दिला नसता, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.भाजपाने या पोटनिवडणुकीतून माघार घेताना राज ठाकरे यांच्या पत्राचं कारण पुढं केलं आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या पत्राचा परिणाम भाजपावर खरचं होत असेल किंवा भाजपा त्यांचे ऐकत असेल, तर महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या महामहिम राज्यपालांना महाशक्तीने परत बोलवावे, अशी विनंती करणारे पत्र राज ठाकरे यांनी लिहावं, असेही त्या म्हणाल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने