'ताजमहाल'च्या 22 बंद खोल्यांबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; म्हणाले, आधी संशोधन करा मगच..

अलाहाबाद:  'ताजमहाल'च्या बंद खोल्या उघडण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं  फेटाळली आहे. न्यायालयानं म्हटलंय की, ही याचिका जनहितापेक्षा प्रसिद्धीसाठी दाखल करण्यात आल्याचं दिसतं. त्यामुळं ही याचिका फेटाळण्यात येत आहे, असं नमूद केलं.याआधी अलाहाबाद उच्च न्यायालयानंही असाच निर्णय दिला होता, ज्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय.



याचिकेत काय मागणी होती?

याचिकाकर्त्याचे वकील रुद्र विक्रम सिंहयांच्या वतीनं हा खटला प्रथम उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला होता. यात ताजमहालमध्ये असलेल्या 22 खोल्या उघडण्याची मागणी करण्यात आलीय. यावरून ताजमहालमध्ये कोणत्या देवतेची मूर्ती किंवा शिलालेख आहे की नाही हे कळू शकतं. ताजमहालमधील ह्या 22 खोल्या अनेक दशकांपासून बंद आहेत. इतिहासकारांच्या मते, मुख्य समाधी आणि इतर इमारतीच्या मजल्याखाली 22 खोल्या आहेत. त्या अद्यापही बंद आहेत. त्यावर सुनावणी करताना हायकोर्टानं सांगितलं की, आधी तुम्ही विद्यापीठात प्रवेश घ्या, पीएचडी करा, माहिती गोळा करा आणि मगच या विषयावर योग्य संशोधन करा, असं सुनावलं आहे.

सर्वोच्च न्यायालयात आव्हान

या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. या याचिकेवर न्यायमूर्ती एमआर शहा आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टानंही ही याचिका फेटाळून लावली. अलाहाबाद उच्च न्यायालयानं म्हटलं होतं की, खोल्या उघडण्याच्या मागणीसाठी कोणत्या ऐतिहासिक संशोधनाची गरज आहे का? याबाबत विचार केला जात आहे. आम्ही रिट याचिका विचारात घेण्यास सक्षम नाही आहोत, त्यामुळं ही याचिका फेटाळण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने