असं विष-अमृत खेळलंय का कधी? असे आहे या आठवड्याचे नॉमिनेशन कार्य

मुंबई : 'बिग बॉस मराठी'चे चौथे पर्व चांगलेच रंगत आहे. कालच बिग बॉसच्या घरातील तिसरा सदस्य घराबाहेर गेला. त्यात एक नवीन सदस्यही आला त्यामुळे आता अधिकच आव्हान वाढले आहे. एलिमिनेशन नंतर येतो तो नॉमिनेशन टास्क. आजच्या भागात रंगणार आहे 'विष अमृत' हे नॉमिनेशन कार्य. या कार्यात मोठा राडा पाहायला मिळणार आहे.

बिग बॉस मराठीचा खेळ सुरू होऊन आता चार आठवडे झाले. टास्क, वाद भांडण आणि राडे यांचे सत्र सुरूच आहे. कुरघोडी, एकमेकांवर गेम करणे हे सुरूच आहे. पण आपल्याला नको असलेल्या सदस्याला थेट घराबाहेर काढण्याची संधी बिग बॉसने सर्व सदस्यांना दिली आहे. त्यासाठी एक भन्नाट नॉमिनेशन कार्य बिग बॉसने दिले आहे. त्या कार्याचे नाव आहे 'विष अमृत'



आपण सर्वचजन लहानपणी विष अमृत हा खेळ खेळलो आहोत. पण हा खेळ काहीसा वेगळा आहे. इथे विष मिळवण्यासाठी अक्षरशः झगडावं लागणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरामधून काल योगेश जाधवला बाहेर पडावे लागले आणि घरामध्ये झाली सिझनची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणजेच स्नेहलता वसईकर. त्यामुळे आता तिच्या येण्याने घरातील समीकरण किती बदलणार ही नॉमिनेशन कार्यात कळेल.नुकत्याच समोर आलेल्या प्रमोमध्ये बिग बॉस यांनी सदस्यांवर सोपावले आले आहे विष - अमृत हे नॉमिनेशन कार्य. बिग बॉस यांनी जाहीर केले, "जो सदस्य पेटारा उघडुन त्यातील विष मिळवेल तो ठरवेल विरोधी टीममधील कोणता सदस्य नॉमिनेट होईल". त्यामुळे समोरच्या टीमला कमकुवत करण्याची ही नामी संधी आहे. बघुया यात कोणती टीम बाजी मारणार ? आणि कोणते सदस्य नॉमिनेट होणार.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने