“तुमच्यासारखी वेडी माणसं…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मुंबई :झी टॉकीज या वाहिनीवरील झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड सोहळा नुकतंच पार पडला. या सोहळ्यात अनेक विनोदी नाटक, चित्रपट, पडद्यावरील व पडद्यामागील कलाकारांचा गौरव करण्यात आला. यावेळी भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि सोनाली कुलकर्णी यांच्या बहुचर्चित पांडू चित्रपटाला ८ पुरस्कार मिळाले. या निमित्ताने नुकतंच अभिनेता कुशल बद्रिकेने पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांन दिग्दर्शक विजू माने यांचे कौतुक केले आहे.

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेला ओळखले जाते. कुशल बद्रिकेने आजवर प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी ठरला. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने पांडू चित्रपटाला पुरस्कार मिळाल्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.



मायबाप प्रेक्षकहो, तुम्ही “पांडू” च्या निमित्ताने आम्हाला खूप प्रेम दिलंत तुम्हाला थँक्यू म्हणून तुमच्या ऋणांतून स्वतःची सुटका करून घेणार नाही मला उभा जन्म तुमच्या उपकारात राहायचं आहे. लवकरच सिनेमा घरात भेटू तोपर्यंत आम्हाला कुठे बघायचं ते तुम्हाला माहित आहेच… आजचा दैदिप्यमान सोहळा बघायला विसरू नका, दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता फक्त आपल्या झी टॉकीज वर.  मध्ये ‘पांडू’ ने पटकावले 8 पुरस्कार”, असे कुशल बद्रिकेने म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने