पेट्रोल-डिझेलला करा बाय-बाय; इथेनॉलवर चालणारी पहिली कार भारतात लाँच

 दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज देशातील पहिली इथेनॉलवर चालणारी कार लॉन्च केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असून, त्यामुळे जनतेच्या खिशावर बोजा वाढत आहे. यासाठी केंद्र सरकारला पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉल आणायच्या विचारात आहे. त्यामुळे आज लाँच झालेल्या कारकडे महागड्या पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून पाहिले जात आहे.

टोयोटाने ही कार भारतात फ्लेक्सी-फ्यूल स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक व्हेइकल्स (FFV-SHEV) म्हणून पायलट प्रोजेक्ट अंतर्गत लॉन्च केली आहे. इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या किफायतशीर आणि परवडणाऱ्या तर असतीलच शिवाय वायू प्रदूषणामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणामही टळण्यास मदत होणार आहे. उसापासून इथेनॉल तयार होते. भारताचा ऊस उत्पादनात जगात पहिला क्रमांक लागतो.देशात उसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असल्याने इथेनॉलचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. यासाठी केंद्र सरकार इथेनॉलवर भर देत आहे. इथेनॉलवर चालणारी वाहने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आल्याने इथेनॉलची मागणी वाढेल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढू शकेल असा मानस सरकारचा आहे.



गेल्या वर्षी जूनमध्ये गडकरींनी देशात फ्लेक्स-इंधन वाहने अनिवार्य करण्याबाबत भाष्य केले होते. यामुळे शेतकऱ्यांना मदत होण्यासोबतच भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होईल, असे ते म्हणाले होते. गडकरींच्या मते भारतातील 35 टक्के प्रदूषण हे जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या वाहनांमुळे होते. त्यामुळे इथेनॉलसारखे पर्यायी इंधन विकसित केले पाहिजे जे स्वदेशी, किफायतशीर आणि प्रदूषणमुक्त आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने