दीड हजार भारतीय विद्यार्थ्यांचा मायदेशी परतण्यास नकार

नवी दिल्लीः भारतीय दूतावासाने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना तातडीने देश सोडण्यास सांगितलेले आहे. परंतु येथील जवळपास दीड हजार विद्यार्थ्यांनी भारतात माघारी परतण्यास नकार दिलाय.१९ ऑक्टोबर रोजी युक्रेनमधील भारतीय दूतावासाने एक ॲडव्हायजरी जारी केली. युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे संघर्ष वाढला आहे. सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याने भारतीय नागरीकांनी युक्रेनमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला यातून देण्यात आलेला आहे. शिवाय युक्रेनमध्ये असलेल्या भारतीयांनी लवकरात लवकर युक्रेन सोडण्याचं आवाहन या ॲडव्हायजरीच्या माध्यमातून करण्यात आलं.



युद्धजन्य परिस्थितीमुळे युक्रेनमध्ये १ हजार ५०० भारतीय विद्यार्थी अडकलेले आहेत. मात्र या विद्यार्थ्यांनी मायदेशी परतण्यास नकार दिलाय. आम्ही इथेच शिकणार आणि इथेच मरणार; आमचा जीव गेला तरी फरक पडत नाही, असं या विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलंय.

मागील नऊ महिन्यांपासून रशिया-युक्रेमध्ये युद्ध सुरु आहे. यामध्ये शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक भारतीयांनी युक्रेन देश सोडून भारतात माघारी येणं पसंद केलं. परंतु हे दीड हजार विद्यार्थी तिथेच राहण्यावर ठाम आहेत. भारत सरकारने सांगूनही हे विद्यार्थी परतण्यास नकार देत आहेत. शिक्षणाचं कारण सांगून विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने