निवडणुकीपूर्वीच येऊ शकतो समान नागरी कायदा; हे आहे कारण...

नवी दिल्लीः नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये गुजरात विधानसभेची निवडणूक जाहीर होऊ शकते. या निवडणुकीपूर्वीच राज्य सरकार समान नागरी कायदा आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.मीडिया रिपोर्टनुसार, गुजरात सरकार एक समिती गठीत करण्याची शक्यता आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या अनुषंगाने ही समिती अभ्यास करणार आहे. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश या समितीचे अध्यक्ष असतील.



समान नागरी कायद्याच्या अनुषंगाने अभ्यास केला जाणार असल्याची माहिती गुजरातच्या गृहमंत्र्यांनी दिली. याच संदर्भात आज दुपारी एक पत्रकार परिषद आयोजित केली आहे.गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप सरकार डाव टाकण्याच्या तयारीत आहे. सध्या हिमाचल प्रदेशच्या निवडणुका लागलेल्या आहेत. तिथेही भाजपने ताकदीने लढाई सुरु केली आहे. गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने विशेष लक्ष घातल्याने भाजप कंबर कसून कामाला लागल्याचं दिसून येतंय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने