वयाच्या 17 व्या वर्षी पहिल्यांदा हत्तीची शिकार करणारा मुलगा असा बनला कुख्यात चंदन तस्कर

पूणे : 18 ऑक्टोबर 2004 रोजी देशातील सर्व वाहिन्यांवर एका एन्काउंटरची बातमी येऊन धडकली. एन्काउंटर तर खरंच झाला होता पण त्यावर विश्वास ठेवणं लोकांचा अशक्य होतं. लोकांना विश्वास बसेल तरी कसा. कारण ज्याच्या क्रूरतेचे किस्से ऐकत मोठे झालेल्या लोकांना त्या व्यक्तीचा एन्काउंटर झालाय हे पटतच नव्हतं. तो होता कुख्यात चंदन तस्करी करणारा ‘पुष्पाराज’ अर्थात विरप्पन.तीन राज्यातील पोलीस फोर्स अंगकाठीने बारीक असलेला आणि नेहमी मिशांवर ताव देणाऱ्या विरप्पनच्या मागे हात धुवून लागली होती. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या तीन राज्यांत त्याची सत्ता होती. या तीन राज्यातील 6 हजार चौरस किलोमीटरवर त्यांचे राज्य होते. त्या राज्यात प्रवेश करायचा असल्यास विरप्पनची परवानगी घेणे आवश्यक होते. अन्यथा त्या व्यक्तीचा मृत्यू निश्चित होता.



कुजा मुनिस्वामी वीरप्पन असे त्याचे पूर्ण नाव होते. त्याला सगळे वीरप्पन म्हणून ओळखते. त्याचा जन्म 18 जानेवारी 1952 रोजी कर्नाटकातील गोपीनाथम गावात झाला. त्याने 184 लोकांची हत्या केली होती. ज्यात 97 पोलिसांचा समावेश होता. त्याला पकडण्यासाठी सरकारने तब्बल 5 कोटींचे बक्षीस ठेवले होते. दाऊद इब्राहिम याच्यानंतर एव्हढे बक्षिस केवळ वीरप्पनवरच ठेवले गेले होते. त्याकाळात 2 अब्ज रुपये किमतीच्या एकूण 10,000 टन चंदनाची त्याने तस्करी केल्याचे सांगितले जाते. त्याला शोधण्यासाठी अंदाजे 100 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगितले जाते.त्या काळात कर्नाटक आणि तामिळनाडूच्या सीमावर्ती भागात वीरप्पनची खूप दहशत होती. वीरप्पनने वयाच्या 17 व्या वर्षी पहिल्यांदा हत्तीची शिकार केली. हत्तीचे दात आंतरराष्ट्रीय बाजारात लाखोंच्या किमतीत विकले जातात. त्यामुळे बलाढ्य हत्तीला ठार करण्याची एक वेगळी शैली त्याने आत्मसात केली होती. ती म्हणजे हत्तीला एकाच झटक्यात मारायचे असेल तर त्याच्या कपाळाच्या मध्यभागी गोळी झाडणे.

विरप्पन अँब्युलंसमध्ये बसला आणि त्याचा शेवटचा प्रवास सुरू झाला. त्याला इच्छित स्थळी आणल्यावर एसटीएफचे दोन्ही जवान खाली उतरले. संपूर्ण टीम त्यावेळी त्याच्या स्वागताला बंदूक घेऊन उभी होती. स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करण्यास वीरप्पनला सागंण्यात आलं पण बंद अँब्युलंसच्या काचेतून वीरप्पनच्या साथीदारांनी पहिल्यांदा फायरिंग केलं. त्यानंतर एसटीफने चारी बाजूने अँब्युलंन्सवर फायरिंग केली. तब्बल वीस मिनटं चाललेल्या या चकमकीत 338 राऊंड गोळ्या झाडल्या गेल्या. अँब्युलंसमधून फायरिंग बंद झालं. अँब्युलंसच दार उघडलं गेलं. तर बिगर मिशांचा 52 वर्षाचे वीरप्पन नावाचे वादळ निपचीत पडले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने