रशियाने युक्रेनवर डागले ७५ क्षेपणास्त्र, पाच जणांचा मृत्यू, घटनेचा भीषण व्हिडीओ आला समोर

युक्रेन : युक्रेन आणि रशियामधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर ७५ क्षेपणास्त्र डागले आहेत. क्रिमिया आणि रशियामधील पुलावर स्फोट घडवल्याच्या रशियाच्या आरोपानंतर आज हा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. शांतताप्रिय लोकांवर केलेला हा निर्दयी हल्ला आहे, अशी प्रतिक्रिया युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दिली आहे. या हल्ल्यानंतर घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन नागरिकांना झेलेन्स्की यांनी केले आहे. त्यांना आम्हाला पृथ्वीवरूनच पुसून टाकायचे आहे, असे म्हणत झेलेन्स्की यांनी रशियाला सुनावले आहे.



शहरातील अनेक शहरांमध्ये हा हल्ला करण्यात आल्याची माहिती युक्रेनच्या अध्यक्षांच्या कार्यालयाचे उपप्रमुख कायरेलो त्मोशेन्को यांनी दिली आहे. शहरातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याचे आव्हान सोशल मीडियावरुन त्मोशेन्को यांनी केले आहे. स्थानिक वेळेनुसार किव्हमध्ये सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी क्षेपणास्त्र हल्ला झाला आहे. यानंतर शहरात गोंधळ निर्माण झाला असून नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने