पश्चिम रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकीट दरात मोठी वाढ, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय!

मुंबई : सध्या दिवाळी सणानिमित्त चाकरमानी आपापल्या मूळ गावी जात आहेत. याच कारणामुळे मागील काही दिवसांपासून रेल्वेस्थानकं आणि बसस्थानक परिसरात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसतेय. आपापल्या गावी गाण्यासाठी लोकांची लगबग असताना आता पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची गर्दी कमी व्हावी यासाठी पश्चिम रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटामध्ये वाढ केली आहे.




मुंबई मध्य विभागातील पश्चिम रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आले आहे. दिवाळीमित्त रेल्वेस्थानक परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. हीच गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत हा निर्णय लागू असेल. पश्चिम रेल्वेच्या काही मोजक्या रेल्वेस्थानकांवर ही प्लॅटफॉर्म तिकीटवाढ लागू असेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने