जय शाह यांची ऐतिहासिक घोषणा, आता महिलांना देखील मिळणार समान मानधन

मुंबई भारतीय क्रिकेटमध्ये यापुढे महिला आणि पुरुषांमध्ये वेतनाच्या बाबतीत कोणताही भेदभाव केला जाणार नाही. हा भेदभाव दूर करण्यासाठी बीसीसीआयने पहिले पाऊल उचलले आहे. सर्वांना समान मॅच फी मिळेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. जय शाह म्हणाले की, आम्ही आमच्या करारबद्ध महिला क्रिकेटपटूंसाठी वेतन समानता धोरण लागू करत आहोत.



बीसीसीआय सचिव म्हणाले की, मला जाहीर करण्यात आनंद होत आहे बीसीसीआय नव्या दिशेने पहिले पाउल टाकले आहे. अशा स्थितीत या धोरणांतर्गत आतापासून पुरुष आणि महिला दोघांसाठी समान मॅच फी समान असेल. यापुढे महिलांनाही पुरुषांइतकीच मॅच फी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. कसोटी क्रिकेटमधील एका सामन्यासाठी 15 लाख रुपये उपलब्ध आहेत. तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुरुषांना एका सामन्यासाठी 6 लाख रुपये दिले जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने