स्पर्धकांबरोबर असभ्य भाषेत बोलणं पडलं महागात, बिग बॉसच्या घरातून योगेश जाधव बाहेर

 मुंबई छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेला कार्यक्रम म्हणजे बिग बॉस. यंदा बिग बॉस मराठीची रंगत दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे. २ ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या बिग बॉसमध्ये अनेक राडे, भांडण, स्पर्धकांमध्ये सतत होणारे वाद पाहायला मिळत आहेत. नुकतंच बिग बॉसच्या घरातील तिसरे एलिमेशन पार पडले. निखिल राजेशिर्के, मेघा घाडगे यांच्यापाठोपाठ बिग बॉसच्या घरातून जेंटल जाईंट अशी ओळख असलेल्या योगेश जाधवला घराबाहेर पडावे लागले.



यंदाच्या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या चावडीमध्ये महेश मांजरेकरांनी किरण माने यांची चांगलीच कानउघडणी केली. महेश मांजरेकरांनी चावडीवर बऱ्याच सदस्यांची शाळा घेतली? कोण कुठे चुकले? कोण बरोबर खेळले. या सगळ्याचा हिशोब घेतला. सदस्यांच्या वर्तणुकीसाठी त्यांनी स्पर्धकांना चांगलंच सुनावले. पण यावेळेस महेश मांजरेकरांचा ओरडा नक्की कोणत्या सदस्याला मिळेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक होते. किरण माने यांच्या बऱ्याच गैरसमजुती महेश मांजरेकरांनी दूर केल्या. तसेच विकासाला त्याचे खेळू दे असा सल्ला देखील दिला.

‘मी सगळं बघतोय. इथे सगळेच खेळायला आलेत. तिथे कुणाचं वैयक्तिक भांडण नाहीये. मी काय त्यांच्यावर रोल फेकतो. तू कुणाची लायकी काढतोस? तू स्वतः काय आहेस? मी बॅग घेऊन घराबाहेर काढेन तुला’. या शब्दात महेश मांजरेकरांनी किरण मानेंना खडसावून सांगितले. त्याचबरोबर बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT चुगली बूथद्वारे आलेल्या चुगलीमुळे अक्षय आणि अपूर्वा किरण मानेंवर भडकले. तर अमृता देशमुखने देखील किरण मानेंनी केलेल्या वक्त्यावर नाराजी दर्शवली.यानंतर बिग बॉसमधील घरातून एक सदस्य बाहेर पडण्याची वेळ आली. बिग बॉसच्या घरातील विकास आणि योगेश डेंजर झोनमध्ये होते. त्यातून योगेश जाधवला बिग बॉसचे घर सोडावे लागले. बिग बॉसने त्याच्या नावाची घोषणा केल्यानंतर तो भावूक झाला. तसेच घरातील अनेक सदस्यही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी महेश मांजरेकरांनी त्याच्या खेळात कुठे चुकले, तो कुठे बरोबर होता, याबद्दल त्याला सांगितले. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने