आधीच्या सरकारांमुळे जनता सुविधांपासून वंचित; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप.

हिमाचल : राज्यांतील लोकांना मागील सरकारने वंचित ठेवले असा आरोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. हिमाचलमध्ये होणाऱ्या विकास कामामुळे गुंतवणुकीबरोबरच रोजगाराचीही संधी वाढणार आहे, असा विश्‍वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. इंदिरा गांधी स्टेडियमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वंदे भारत एक्स्प्रेसचे लोर्कापण करण्यात आले. तसेच बल्क ड्रग पार्क (औषध वाटिका) ची पायाभरणी केली आणि इंडियन इन्स्टिट्‌यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयटी) उनाचे अनावरण केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की केंद्रातील सरकार तुम्हाला विसाव्या शतकाबरोबरच नव्या शतकातील सुविधा देण्यास कटिबद्ध आहे. स्वातंत्र्य मिळवून बरेच वर्षे झाले तरी दळणवळणाची सुविधा नाही. आज मात्र हिमाचलमध्ये केवळ आधुनिक रेल्वेच आली असून ती धावणार देखील आहे. दिल्लीतील लोकांनी हिमाचलच्या हिताकडे लक्ष दिले नाही आणि त्याचे परिणाम स्थानिक नागरिकांना भोगावे लागले. यापूर्वीच्या सरकारांनी खड्डे भरण्याचे देखील प्रयत्न केले नाहीत.परंतु आम्ही विकासाच्या नव्या इमारती उभारत आहोत. ज्या सुविधा मागच्या शतकातच मिळावयास हव्या होत्या, त्या आता मिळत आहेत. आमचे सरकार २१ व्या शतकातील भारताच्या आशा आकांक्षा पूर्ण करत आहे. नवीन भारत जुन्या अडचणींवर मात करत आहे आणि वेगाने पुढे वाटचाल करत आहे. हिमाचल प्रदेशची जनता प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांना मत देऊन सत्तेत आणण्याचा ट्रेंड मोडीत काढतील, असा विश्‍वासही मोदी यांनी व्यक्त केला.

उना येथे सुरू होत असलेल्या औषधी, शिक्षण आणि रेल्वे प्रकल्पाचा हिमाचल प्रदेशावर सकारात्मक परिणाम होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले. धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या अगोदरच हिमाचल प्रदेशला कोट्यवधींची भेट देण्याची घोषणा करताना मला विशेष आनंद होत आहे, असेही मोदी म्हणाले.औषध वाटिकेच्या माध्यमातून हिमाचलच्या विकासाचे नवीन पर्व सुरू होत आहे. या वाटिकेमुळे औषधाच्या कच्च्या मालासाठी परदेशांवर अवलंबून राहण्याची गरज आता भासणार नाही.

सत्तारूढ भाजपसाठी दौऱ्यातून संजीवनी

पंतप्रधानांचे हिमाचल दौरे सत्तारूढ भाजपसाठी संजीवनी म्हणून पाहिले जात आहे. कारण या आठवड्यातच निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांची धर्मशाला येथे एका सभेचे आयोजन करण्याचा भाजप श्रेष्ठींचा प्रयत्न असल्याचे सूत्राने सांगितले. पंधरा ऑक्टोबर रोजी गृहमंत्री अमित शहा यांचा सिरमौर येथे दौरा होत असून त्यानंतर आचारसंहिता लागू होऊ शकते. मोदींचा १६ ऑक्टोबर रोजी धर्मशाला येथे सभा होत असेल तर त्यानंतर आचारसंहिता लागू होऊ शकते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने