यात्रेदरम्यान तुम्ही सनस्क्रीनचा वापर करता का? प्रश्नावर राहुल गांधींचं मजेशीर उत्तर; म्हणाले, “आईने…”

आंध्रप्रदेश : काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ने कर्नाटकातून आंध्रप्रदेश राज्यात प्रवेश केला आहे. अलिकडेच ‘भारत जोडो यात्रे’ने १००० किलोमीटरचा टप्पा पार केला होता. या पदयात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी सर्वसामान्य नागरिकांशी भेटत असून, त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. त्यातच आता राहुल गांधींचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये काही कार्यकर्त्यांनी राहुल गांधींशी विविध विषयांवरून अनौपचारिक पद्धतीने गप्पा मारल्या आहेत.



यावेळी फावल्या वेळात काय करता? असा सवाल राहुल गांधींना विचारण्यात आला. त्यावर “यात्रेतून मिळालेल्या वेळेत व्यायम करतो. पुस्तके वाचतो. आई, बहिण आणि मित्रांबरोबर फोनवरून गप्पा मारतो. आईला विचारतो ती काय करत आहे,” असं राहुल गांधींनी म्हटलं.एका कार्यकर्त्याने विचारले की तुमच्या चेहऱ्यावर टॅनिंग ( त्वचेवरील काळसरपणा ) दिसत नाही, कोणत्या सनस्क्रीनचा वापर करता?, त्यावर राहुल गांधींनी टी-शर्ट बाजूला करत हातावरील टॅनिंग दाखवलं. “यासाठी आईने सनस्क्रीन पाठवलं आहे, पण वापरत नाही,” असं उत्तर त्यांनी हसत दिलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने