केजरीवाल सरकारकडून राष्ट्रपतींचा अवमान ; दिल्लीच्या नायब राज्यपालांचा आरोप

नवी दिल्ली : रविवारी, २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल हे राजघाट तसेच विजयघाट या समाधीस्थळांवर उपस्थित न राहिल्याने दिल्लीचे नायक राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी केजरीवाल यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. केजरीवाल सरकारने देशाचे घटनात्मक प्रमुख असलेल्या राष्ट्रपतींचा हेतुपूर्वक अवमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.या पत्रात ते म्हणतात की, महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीला आपण तसेच आपल्या सरकारने (दिल्ली राज्य सरकार) हा महापुरुषांबद्दल जो अनादर दाखविला आहे, ते मी अत्यंत खेदपूर्वक, व्यथित अंत:करणाने आपल्या निदर्शनास आणत आहे. रविवारी राजघाट आणि विजयघाटावर देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष आणि अन्य राजकीय नेते उपस्थित होते, पण आपण (केजरीवाल) किंवा आपल्या सरकारचा मंत्री तेथे उपस्थित राहिला नाहीत, हे आपल्या निदर्शनास आणणे मला भाग पडत आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री (मनीष सिसोदिया) हे केवळ उपचार म्हणून तेथे काही मिनिटे होते, पण पूर्णवेळ तेथे थांबण्याची त्यांना गरज वाटली नाही. 



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने