“गृहमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी छोटीशी भेट”; जम्मू कारागृह महासंचालकांच्या हत्येनंतर दहशतवादी संघटनेचा इशारा

 जम्मू-काश्मीर: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वी एक मोठी घटना घडली आहे. जम्मू-काश्मीर कारागृह विभागाचे पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची हत्या करण्यात आली आहे. धारदार शस्त्राने गळा चिरून त्यांची हत्या केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यात आता त्यांच्या हत्येची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाशी संलग्न असणाऱ्या पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट( पीएएफएफ) या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.३ ऑगस्ट २०२२ मध्ये हेमंत लोहिया यांची जम्मू-काश्मीरच्या कारागृह महासंचालकपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच त्यांची हत्या झाली आहे. जम्मूतील उदयवाला भागातील एका घरात लोहिया यांचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेनंतर घर काम करणारा फरार झाला आहे.दरम्यान, हेमंत लोहिया यांच्या हत्येची जबाबदारी पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. हत्येनंतर त्यांनी एक पत्रक जारी केलं आहे. त्यात म्हटलं की, ‘आमच्या विशेष पथकाने गुप्त अभियान राबवलं आहे. त्यामध्ये पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची हत्या केली आहे. हे एक मुख्य लक्ष होते. आम्ही केव्हाही, कुठेही अचूकपणे हल्ला करू शकतो. गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यापूर्वी ही एक छोटीशी भेट आहे,’ असा इशाराही पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंटने दिला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने