Mission Mangalyaan : आठ वर्ष कार्यरत, ४५० कोटींचा खर्च; इंधन संपल्याने मंगळयानाशी संपर्क तुटला

 नवी दिल्ली: भारताचे ‘मिशन मंगळयान’ संपुष्टात आलं आहे. कारण, मंगळ ग्रहाची माहिती घेण्यासाठी पाठवलेल्या मंगळयानाचे इंधन आणि बॅटरी संपल्याचं स्पष्ट झालं आहे. आठ वर्षांनी मंगळयानशी संपर्क तुटल्याचं भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ( इसरो ) जाहीर केलं आहे.२०१३ साली मंगळयान हे उपग्रह भारताने सोडले होते. सहा महिन्यांचा कालावधी गृहीत धरून हे उपग्रह तयार करण्यात आले होते. मात्र, मंगळाच्या भोवती हे उपग्रह आठ वर्षांहून अधिक काळ कार्यरत राहिले. अलिकडेच मंगळावरती एकामागे एक अनेक ग्रहण झाली. यातील एक ग्रहण हा ७ तास १० मिनिटे चालले. उपग्रहाची बॅटरी ही केवळ १ तास ४० मिनिटे ग्रहणामध्ये काम करू शकते. दीर्घ ग्रहणाने उपग्रहाची बॅटरी सुरक्षित मर्यादा ओलांडून संपल्याने त्याने काम करणे बंद केले.भारताने हे उपग्रह ५ नोव्हेंबर २०१२ साली सोडले होते. २४ सप्टेंबर २०१४ ते मंगळाच्या कक्षेत पोहचले. केवळ ४५० कोटी रुपयांमध्ये या उपग्रहाची निर्मिती झाली होती. मंगळाच्या पृष्ठभागाची वैशिष्ट्ये, आकारविज्ञान, खनिजपदार्थ आणि मंगळाच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी हे उपग्रह मंगळाच्या दिशेने रवाना करण्यात आले होते.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने