एकवेळ खुनाचा गुन्हा चालला असता... जितेंद्र आव्हाड भावनिक

 मुंबईः मी सगळं मान्य करेन पण ३५४ (विनयभंग) मान्य करणार नाही. ३५४ आणि ३७६ यासाठी माझा जन्म नाही. एकवेळ खुनाचा गुन्हा चालला असता पण हे मला सहन होत नाही, अशा भावना जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केल्या.मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना आव्हाड म्हणाले की, माझ्यावरचा गुन्हा हा केवळ षड्यंत्राचाच भाग आहे. 'हर हर महादेव' चित्रपट प्रकरणात विनाकारण मला कोठडीत ठेवलं. कालचा हा प्रकार चुकीचा आहे. यापेक्षा राजकारणात न राहिलेलं बरं. मी सगळं सहन करेन परंतु ३५४चा गुन्हा सहन होत नाही. हे आपल्या काळजाला लागल्याचं आव्हाडांनी सांगितलं. यावेळी ते भावनिक झाले होते.




रविवारी रात्री कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची भूमिका घेतली. अद्याप त्यांनी राजीनामा दिलेला नाही. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यानंतरच याबाबतचा निर्णय होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या पत्रकार परिषदेमध्ये कलम ३५४ या कायद्याची सविस्तर माहिती दिली. काल नेमकं काय घडलं त्याचाही घटनाक्रम सांगितला. अशा पद्धतीने एखाद्याला बदनाम करणं चुकीचं असल्याचं पाटील म्हणाले. शिवाय 'हर हर महादेव' चित्रपटाबाबत जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थ असल्याचंही जयंत पाटलांनी सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने