पंधरा वर्षे जुनी वाहनं होणार स्क्रॅप; प्रत्येक जिल्ह्यात होतेय रोजगार निर्मिती

मुंबईः केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठा निर्णय घेत असल्याचं जाहीर केलं. पंधरा वर्षे जुनी असलेली सर्व सरकारी वाहनं स्क्रॅप होणार आहेत. या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात रोजगार निर्मिती होईल, असं त्यांनी सांगितलं.पर्यावरणपूरक आणि धाडसी निर्णयामुळे नितीन गडकरी यांची वेगळीच ओळख आहे. आता गडकरी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. या निर्णयाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सहमती दर्शवल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

गडकरी म्हणाले की, भारत सरकारकडे जेवढी जुनी, पंधरा वर्षे पूर्ण झालेली वाहनं आहेत. ती आता लवकरच स्क्रॅप होतील. फक्त केंद्र सरकारचीच नाही प्रत्येक राज्याला याबाबत सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारी संस्था आणि उपक्रमांसाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्या मग त्या ट्रक, बस किंवा कार स्क्रॅप केल्या जातील. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंमतीने काम करा, अशी दाद दिल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं.



प्रत्येक जिल्ह्यात रोजगारनिर्मित होणार

सरकारी गाड्या स्क्रॅप करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये युनिट उभा करणार असल्याचं गडकरी म्हणाले. त्यामुळे त्या-त्या जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती होणार आहे. या निर्णयामुळे वाढलेल्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येईल. सध्या तरी केवळ सरकारी वाहनांच्या बाबतीत हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने