दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

मुंबईः महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी मान्यता दिली आहे. देशपातळीवर हा मोठा निर्णय असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.दिव्यांगांसंदर्भात कालच मंत्रालयामध्ये बैठक संपन्न झाली. याच बैठकीमध्ये राज्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.



देशात पहिल्यांदाच राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. आपण आज मंत्रालयासमोर लाडू वाटणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.''ज्यांना हात नाहीत, पाय नाहीत, चालता-बोलता येत नाही, दिसत नाही त्यांच्यासाठी हा मोठा निर्णय आहे. दिव्यांगांच्या लढ्यामध्ये हे आमचं मोठं यश आहे'' अशा भावना आमदार कडूंनी व्यक्त केल्या. या मंत्रालयाची जबाबदारी बच्चू कडू यांच्याकडेच येईल, असं राजकीय जाणकार सांगत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने