इंग्लंडचा 10 विकेट्स राखून विजय; भारताचे आव्हान संपुष्टात

मुंबई : इंग्लंडची सलामी जोडी जॉस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी नाबाद शतकी सलामी देत भारतापासून सामना दूर नेण्यास सुरूवात केली.सावध सुरूवात करणाऱ्या अॅलेक्स हेल्सने 28 चेंडूत अर्धशतक ठोकत इंग्लंडला 8 षटकात 84 धावांपर्यंत पोहचवले.



जोस बटलरनंतर इंग्लंडचा दुसरा सलामीवीर अॅलेक्स हेल्सने आक्रमक फटकेबाजी करत इंग्लंडला पॉवर प्लेमध्येच 63 धावांपर्यंत पोहचवले.भारताचे विजयासाठीचे 169 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडने पॉवर प्लेमध्ये आक्रमक सुरूवात केली. जॉस बटलरने फटकेबाजी करत इंग्लंडला 3 षटकात बिनबाद 33 धावांपर्यंत पोहचवले.हार्दिक पांड्याने 36 चेंडूत दमदार 63 धावांची खेळी केली मात्र तो शेवटच्या चेंडूवर हिटविकेट झाला. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर चौकार मारून देखील भारताला 170 च्या पार जाता आले नाही.विराट बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्याने शेवटच्या दोन षटकात झुंजार फलंदाजी करत आपले अर्धशतक आणि संघाचे दीडशतक पूर्ण केले.

इंग्लंडने भारताचा सेमी फायनलमध्ये तब्बल 10 विकेट्सनी पराभव करत वर्ल्डकपमधून पॅक अप केले. भारताने 169 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान इंग्लंडने 16 षटकात एकही विकेट न गमावता पार केले. जॉस बटलरने 49 चेंडूत नाबाद 80 धावा केल्या. तर अॅलेक्स हेल्सने 47 चेंडूत नाबाद 86 धावा केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने