पासपोर्ट फ्री परदेशवारी शक्य? 'ही' विमान कंपनी करतेय टेक्नोलॉजी टेस्टींग

दिल्ली : आता अशा एका तंत्रज्ञानावर काम सुरू आहे, ज्यामुळे तुम्हाला पासपोर्टशिवाय परदेश वारी करता येणार आहे. यावर ब्रिटीश एयरवेज काम करत आहे. त्यामुळे लंडनचे प्रवासी पासपोर्ट फ्री परदेश वारी करू शकतील.यासाठी British Airways बायोमॅट्रिक टेक्नोलॉजीचं ट्रायल लंडनच्या Heathrow एयरपोर्ट टर्मिनल 5 वर केलं जात आहे. यामुळे लंडनचे प्रवासी आपला चेहरा, पासपोर्ट आणि बोर्डिंग पास स्मार्टफोन आणि टॅबमध्ये स्कॅन करू शकतील.



कशी काम करते ही टेक्नोलॉजी

या एयरपोर्ट टर्मिनलवर Smart Bio-Pod कॅमेरा लावण्यात आला आहे. ज्यामुळे इथे येणाऱ्या प्रवाशांना तीन सेकंदाच्या आत व्हेरिफाय केलं जाऊ शकतं. त्यामुळे प्रवाशाला पासपोर्ट दाखवण्याची गरज पडणार नाही. प्रवाशी पासपोर्ट बॅगेतच ठेवून परदेश फिरू शकतात.यासाठी लंडनचे लोक आपलं बायोमॅट्रीक डेटा घरून पण रेकॉर्ड करू शकतात. याचा वापर British Airways इंटरनॅशनल फ्लाइट ट्रॅव्हलिंग दरम्यान केला जातो. यामुळे स्मार्ट टेक्नोलॉजीने प्रवाशांना इम्प्रुव्ड एयरपोर्ट एक्सपारियंस मिळू शकतो. त्यामुळे फ्लाइटमध्ये बोर्ड करतानाचा प्रवाशांचा वेळ पण वाचू शकेल. तसंच यामुळे प्रवाशांच्या शंका कमी होतील आणि त्याला योग्य उत्तर देणंही शक्य होईल.

कधीपर्यंत चालेल ही ट्रायल?

British Airways चा बायोमॅट्रीक व्हेरीफिकेशन ट्रायल ६ महिन्यांपर्यंत चालेल. याचा लाभ सध्या लंडन ते स्पेन जाणारे यात्री घेऊ शकतात. कंपनी हा सर्व डेटा सुरक्षित ठेवेन असं सांगते. या नव्या टेक्नोलॉजीचा वापर करणारे प्रवासी कस्टमर फास्ट ट्रॅक सिक्युरिटी लेन आणि प्रायोरिटी बोर्डींगचा आनंद घेऊ शकतात. जर ट्रायल यशस्वी झाली तर कंपनी इतर जागांसाठी ही टेक्नोलॉजी लागू करु शकेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने