आधार कार्ड काढून तुम्हाला 10 वर्ष झाले? केंद्राने बदलले नियम

मुंबई - आधार कार्डचे आपल्या देशात अनन्यसाधारण महत्त्व आहे. राष्ट्रीय ओळखपत्र म्हणून आधार कार्डची ख्याती आहे. म्हणून देशातल्या प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. अशात तुम्हाला जर आधार कार्ड बनवून दहा वर्ष झाली असेल किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे झाली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सरकारने नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत. 



केंद्र सरकारने आधार कार्डच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या एका नोटीफीकेशननुसार आधार अपडेट झाल्यानंतर सेंट्रल आयडेंटी डेटामध्ये लोकांना नाव सुनिश्चित करणं सोपी जातं.या नोटिफिकेशननुसार आधार कार्ड होल्डरला आपल्या नोंदणीच्या तारखेपासून 10 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकदा तरी आयडेंटी आणि रहीवासी प्रमाणपत्र अपडेट करणे गरजेचं आहे. म्हणजेच दर दहा वर्षांनी तुम्हाला आधार अपडेट करणे गरजेचे आहे.

आधार कार्ड अपडेट कसं करावं?

  • mAadhaar  पोर्टल किंवा माई आधार mAadhaar अप द्वारे तुम्ही ऑनलाइन आधार कार्ड अपडेट करू शकता.  

  • याशिवाय तुम्ही आधार नोंदणी केंद्रावर ही जाऊन तुम्ही आधार कार्ड अपडेट करू शकता.

  • आधार कार्ड होल्डर प्रमाण पत्र आणि रहीवासी प्रमाणपत्र अपडेट करू शकता. यात तुमचे नाव आणि फोटो असणे गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने