अब्दुल सत्तार यांचे राजीनाम्यासंबंधी मोठे विधान, मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली तर..

औरंगाबाद : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप याच सत्र सुरूच आहे. दरम्यान शिंदे गटातील इतर मंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या गटातील नेते एकेमकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची संधी सोडत नाहीत. तसेच राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमावर नुकसान झाले आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. दरम्यान विरोधकांकडून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी या सर्व आरोपांसंदर्भात बोलतांना विरोधकांना उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी दिली तर मी बुधवारपर्यंत राजीनामा देऊ शकतो. मात्र मी राजीनामा दिल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील सिल्लोडमधून निवडणूक लढवून दाखवण्याची हिम्मत करावी असे अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.



औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलतांना सत्तार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी देताच मी राजीनामा देण्यासाठी तयार आहे. पण, चंद्रकांत खैरे आणि आदित्य ठाकरे यांनी माझ्याविरुद्ध निवडणूक लढवून सिल्लोडमधून विजयी होऊन दाखवावे. मागच्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांची जलील यांच्यामार्फत मीच विकेट घेतली होती. पण आता चंद्रकांत खैरे चांदीचा गदा घेऊन फिरत आहेत. मात्र त्यांच्या गदेचा सामना करण्यासाठी आमची ढाल तयार असल्याचंही कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणालेत.पुढे बोलतांना सत्तार म्हणाले, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे मंगळवारी पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी त्यांची भेट घेऊन राज्यातील अतिवृष्टीबाबत सर्व माहिती देणार असून राज्यातील नुकसानग्रस्त भागाची केंद्रीय पथकाने पाहणी करण्यासंदर्भात मागणी करणार असल्याचेही सत्तार म्हणालेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने