महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस का साजरा केला जातो

दिल्ली : आज 25 नोव्हेंबर, हा “महिला हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस” आहे. ज्याच्यावर विश्वास ठेवून आयुष्य काढायचे स्वप्न बघायचे तोच कधी तुकडे करतो, कधी जाळून मारतो तर कधी विहिरीत ढकलतो, अशा घटना आपण कायमच ऐकत असतो. नुकतीच झालेली श्रध्दा वालकर केस असो किंवा त्यानंतर समोर आलेल्या अजून अनेक घटना या दिवसाची गरज अजून तीव्रतेने जाणवून देतात.



म्हणूनच "महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस" या दिवसाविषयी आपल्या समाजात जागृकता निर्माण करणं किती गरजेच आहे हे जाणवतं. या घटना फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात घडत असतात. युनायटेड नेशन्सच्या एका अहवालानुसार, १५ ते ४९ वर्षे वयोगटातील जवळपास १९ टक्के स्त्रियांना जोडीदाराकडून शारीरिक आणि/किंवा लैंगिक हिंसाचाराचा सामना करावा लागतो. काही प्रकरणांमध्ये, या हिंसाचाराचा शेवट महिलांच्या मृत्यूमध्ये होतो.अशाच एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या निषेधात या दिवसाची सुरूवात झाली. आत्ताच्या काळात भारतातच नव्हे तर संपुर्ण जगात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. याआधीही महिला सक्षमीकरण, या घटनांमधुन महिलांना सुरक्षित वाटावं यासाठी प्रयत्न झालेत.

कसा सुरू झाला महिला हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस?

25 नोव्हेंबर 1960 रोजी डोमिनिकन रिपब्लिकच्या ची हुकूमशहाच्या लोकांनी हत्या केली. Trujillo च्या राजवटीविरुद्ध चळवळींमध्ये सक्रिय असलेल्या बहिणींना मारहाण करण्यात आली आणि त्यांचा गळा दाबून खून करण्यात आला. त्यानंतर त्यांचा मृत्यू अपघाती वाटावा यासाठी त्यांना डोंगराळ रस्त्यावरून चालत्या जीपमध्ये टाकण्यात आले.तुम्हाला ही घटना पुराण कथेतील वाटु शकते. पण हे 20व्या शतकाच्या मॉर्डन जगात घडल होत. या गोष्टीचा निषेध म्हणून आणि ना श्रद्धांजली देण्यासाठी डिसेंबर 1999 मध्ये, युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने 25 नोव्हेंबर हा “महिला हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस” म्हणून साजरा करण्याच ठरवल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने