"एक डोळा नव्हता तरी.. "अमिताभ बच्चन यांनी केले सैफ अली खानच्या वडिलांचे कौतुक

मुंबई: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती चा यंदा 14 वा सिझन सुरू आहे. नेहमीच प्रमाणे या भागालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या शोमध्ये अमिताभ बच्चन हे नेहमीच काही प्रेरणादायी गोष्टी दर्शकांसोबत शेअर करत असतात. या शोच्या नुकत्याचं भागात  अभिनेते अमिताभ बच्चन यांनी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडी यांचं कौतुक केलं.

सोनी टीव्हीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या नवीन प्रोमो क्लिपमध्ये, अमिताभ बच्चन यांनी मन्सूर याची आठवण काढली. ज्यामूळे त्यांनी एका डोळ्यात दृष्टी जवळजवळ गमावली होती. त्याच्या अपघातानंतर सहा महिन्यांत आपल्या परिस्थितीशी लढत ते क्रिकेट संघाचे सर्वात तरुण कर्णधार बनले.या प्रोमोमध्ये अमिताभ म्हणातात, “मी तुम्हाला एका भारतीय क्रिकेटपटूबद्दल सांगू इच्छितो ज्याने अपघातात एक डोळची दृष्टी जवळपास गमावली. त्याला गाडी चालवतानाच काय तर  स्वतःला पाण्याचा एक ग्लास पाणी भरण्यासाठी अडचण येत होती. या अडचणींचा सामना करत असतानाच त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीचा अंत होईल असं त्यांना वाटलं. पण त्यानी आपली परिस्थिती, खेळ आणि मुख्यतः त्याच्या विचारांना आव्हान दिलं आणि स्वत:ला इतकं सक्षम बनवलं की ते पुन्हा क्रिकेट खेळू शकले.”



"याचा परिणाम असा झाला की अपघातानंतर अवघ्या सहा महिन्यांत, ते क्रिकेट संघाचे सर्वात तरुण कर्णधार बनले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताला आंतरराष्ट्रीय मैदानावर पहिला कसोटी विजय मिळाला. तो क्रिकेटपटू होता मन्सूर अली खान पतौडी. त्याने जगाला सांगितले की जर तुम्ही तुमचे ध्येय स्पष्टपणे पाहू शकत असाल, तर जगात अशी कोणतीही शक्ती नाही जी तुम्हाला तुमच्या महत्त्वाकांक्षेपासून दूर ठेवेल,” असेही अमिताभ पुढे म्हणाले.जुलै 1961 मध्ये, मन्सूर एका कारमधून प्रवास करत असताना होव्हमध्ये अपघात झाला. काचेच्या तुकडीने त्याचा उजवा डोळा कायमचा खराब झाला. मन्सूर यांनी डिसेंबर 1961 मध्ये दिल्ली येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले. मद्रासमधील तिसऱ्या कसोटीत त्यानी 103 धावा केल्या, ज्यामुळे भारताने इंग्लंडविरुद्धची पहिली मालिका जिंकली. मार्च 1962 मध्ये मन्सूर भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार झाले. ते जगातील सर्वात तरुण भारतीय कसोटी कर्णधार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने