जनरल असीम मुनीर सांभाळणार पाकिस्तान लष्कराची कमान

पाकिस्तान: पाकिस्तानच्या नव्या लष्करप्रमुखांच्या नावाची घोषणा झाली आहे. जनरल असीम मुनीर हे पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. मुनीर हे जनरल बाजवा यांची जागा घेणार आहेत. पाकिस्तानच्या नव्या लष्करप्रमुखाच्या शर्यतीत अनेक मोठ्या नावांचा समावेश होता. मात्र, देशाची सर्वात मोठी जबाबदारी मुनीर यांच्यावर देण्यात आली आहे. जनरल मुनीर हे गुप्तचर संस्था आयएसआयचे कुप्रसिद्ध नावांपैकी एक मानले जाते. 




कोण आहेत जनरल असीम मुनीर?
जनरल असीम मुनीर हे पाकिस्तानी लष्करातील सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. 2018 मध्ये ते 8 महिने ISI प्रमुख होते. 2017 मध्ये जनरल बाजवा यांनी त्यांना महासंचालक म्हणजेच मिलिटरी इंटेलिजन्सचे प्रमुख बनवले आणि वर्षभरातच ते ISIA चे प्रमुखही बनले. मात्र आठ महिन्यांनंतरच तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांच्या आदेशानुसार त्यांना या पदावरून हटवण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने