नामांतरासाठी सत्ता गमावली, त्याच विद्यापीठाने पदवी दिल्याने शरद पवार भावूक

औरंगाबाद : महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळाच्या नजरा आज एका खास कार्यक्रमाकडे होत्या. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी आणि भाजप या दोन विरोधी पक्षांचे तगडे नेते उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्यपाल उपस्थित आहेत. गडकरी आणि पवार या दोघांनाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे डी लीट पदवी मिळाली आहे.



या सोहळ्यात बोलताना शरद पवार भावुक झाले. ज्या मराठवाडा सत्तेवर पाणी सोडावं लागलं. त्याच विद्यापीठाने जवळजवळ 32 वर्षानंतर डी. लिट देऊन गौरव केल्यामुळे शरद पवार भावूक झाले. या सोहळ्यावेळी बोलताना पवार काही वेळ शांत राहिले. पदवी मिळाल्यानंतर शरद पवार यांनी मराठवाडा आंदोलनातील आठवणींना विद्यापीठाच्या निर्मिती प्रक्रियेपासूनच्या एकंदरीत आठवणींना उजाळा दिला पुढे बोलताना त्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.या कार्यक्रमावेळी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बोलताना म्हणाले की, आजकाल मिळणाऱ्या शिक्षणाचा दर्जा सुधारला आहे. वेगवेगळ्या गोष्टींचं शिक्षण घेता येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने