जितेंद्र आव्हाडांना मोठा दिलासा; जामीन मंजूर

मुंबई : राष्ट्रावादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आव्हाड यांच्यावर सोमवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आव्हाड यांना आज (ता.15 नोव्हेंबर) सकाळी ११ वाजेपर्यंत अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होईपर्यंत अटकेची कारवाई करू नये, असे निर्देश कोर्टाने मुंब्रा पोलिसांना निर्देश दिले होते. आता त्यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी पार पडली. ठाणे कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती प्रणय गुप्ता यांनी हा निर्णय दिला.



न्यायालयात काय घडलं?

जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने वकील गजानन चव्हाण यांनी बाजू मांडली. न्यायालयामध्ये आव्हाड यांच्या वतीने तिथे घडलेल्या सर्व प्रकरणाच्या क्लिप सादर करण्यात आल्या आहेत. तसेच आधीच्या सभेमध्ये सबंधीत महिलेला बहिन असे संबोधले होते, ती क्लिप सुद्धा न्यायालयात सादर करण्यात आल्या होत्या. तसेच त्या महिलेला गर्दीतून बाजूला जाण्यास सांगतो होतो. माझ्यावर राजकीय हेतुने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे आव्हाडांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले होते.

नेमकं काय घडलं?

वाय जंक्शन येथे रविवारी रात्री एमएमआरडीएने बांधलेल्या एका पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केले गेले. या लोकार्पण कार्यक्रमास आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाडीत बसून जात असताना रिदा त्यांना भेटण्यासाठी जात होत्या. त्याचवेळी आव्हाड हे समोरून येत होते. त्यांनी विनयभंग करण्याच्या उद्देशाने बाजूला हो, असे म्हणत ढकलले. असे तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेनंतर त्या परिमंडळ एकचे उपायुक्तांना भेटल्या आणि मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आव्हाड यांना एका प्रेक्षकास मारहाण केल्याप्रकरणी अटक झाली होती. त्यानंतर हा दुसरा गुन्हा दाखल झाला.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने