श्रद्धाचा मारेकरी आफताब पूनावालाशी माझा संबंध सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन; भाजप नेत्याचा थेट इशारा

दिल्ली: दिल्लीतील श्रद्धाच्या हत्येप्रकरणी देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आफताब पूनावाला यानं त्याच्या लिव्ह-इन पार्टनरची निर्घृण हत्या केली. या घटनेविरोधात देशभरात आक्रोश व्यक्त होतोय. सोशल मीडियावर अनेकजण राग व्यक्त करत आहेत.आफताबनं केलेल्या कृत्यासाठी त्याला कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी केली जात आहे. वसईची श्रद्धा वालकर ही दिल्लीत प्रियकर आफताब पूनावालासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. आफताबनं तिची हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. हे तुकडे त्याने मेहरौलीच्या जंगलात विविध ठिकाणी फेकले. तब्बल सहा महिन्यांनंतर हे सत्य समोर आलं.


दिल्ली पोलिसांनी आफताब अमीन पूनावाला  याला अटक केली असून त्याला सोबत घेऊन श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे जप्त करत आहेत. त्याचवेळी, श्रद्धाचा मारेकरी आफताब पूनावालाचा भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावालायांच्याशी संबंध असल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्यानं केला होता. त्यानंतर भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी आप आणि आप नेत्याला कायदेशीर नोटीस पाठवली असून श्रद्धाचा मारेकरी आफताब पूनावाला याच्याशी माझा कोणता संबंध सिद्ध केल्यास मी कायमचं राजकारण सोडेन, असा इशारा दिलाय.

भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी ट्विटव्दारे आप नेते नरेश बालियान यांना कायदेशीर नोटीस पाठवलीय. बालियान यांनी आफताब पूनावालाच्या आडनावाशी शहजाद यांचा कोणता संबंध आहे का? असा प्रश्न विचारला होता. यासोबतच बालियान यांनी जर त्यांच्यात (शहजाद पूनावाला) काही संबंध नाही, तर शहजाद पूनावाला का पळून जात आहेत?, असा सवाल केला होता.त्यानंतर आप आणि नरेश बालियान यांच्या ट्विटवर भाजप प्रवक्ते शहनाज पूनावाला यांनी फौजदारी कारवाई सुरू करण्याची मागणी केलीय. शहनाज यांनी म्हटलंय की, 24 तासांच्या आत 'आप'नं आफताबसोबतच्या 'माझ्या नात्याचा' पुरावा दिला तर मी राजकारण सोडेन आणि नाही दिला तर अरविंद केजरीवाल यांना राजीनामा द्यावा लागेल. यासाठी मी लाय डिटेक्टर चाचणीसाठीही तयार आहे. अरविंद केजरीवाल  तयार आहेत का? असा सवाल त्यांनी केलाय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने