भारतातील तीन उद्योजिकांचं फोर्ब्जच्या लिस्टमध्ये समावेश

मुंबई -  फोर्ब्ज वेळोवेळी देशातल्या आणि जगातल्या श्रीमंत, ताकदवान लोकांची यादी जाहीर करत असते. या यादीत नावाचा समावेस होणं फार सन्मानाचं समजलं जातं. यंदाच्या २० आशियाई उद्योजिकांच्या यादीत ३ भारतीय उद्योजिकांचा समावेश आहे. यंदाच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे ज्यांनी कोरोना काळातील अनिश्चिततेतही व्यावसाय वृध्दीत उल्लेखनीय काम केलं आहे.



कोण कोण आहेत यादीत

या यादीत स्टील अथॉरीटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) च्या अध्यक्षा सोमा मंडल, अमक्योर फार्माच्या कार्यकारी संचालिका नमिता थापर व होनासा कंज्यूमर की सहसंस्थापिका व चीफ इनोव्हेशन ऑफीसर गझल अलघ यांच्या नावांचा समावेश आहे.

कोण आहेत या भारतीय उद्योजिका

सोमा मंडल

सोमा मंडल या स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल)च्यी सध्याच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी १ जानेवारी २०२१ ला पदभार स्वीकारला होता. त्या सोमा मंडलच्या पहिल्या फंक्शनल डायरेक्टर सोबत पहिल्याच अध्यक्षा होत्या. कोरोना काळात आर्थिक मंदी आलेली असली तरी कंपनीत कंटिन्युटी होती. कंपनीच्या उत्पादनांचं ब्रँडींग करण्यावर भर देतात.

नमिता थापर

नमिता थापर या मल्टिनॅशनल फार्मसी कंपनी एमक्युअर फर्मास्युटिकलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. शिवाय शार्क टँक इंडिया सीझन १ च्या जज पण होत्या. त्या कॉर्पोरेट जगाची मोठी हस्ती आहे.

गझल अघल

गझल अघल या मामाअर्थ (Mama Earth) ची को-फाउंडर आहे. या पण शार्क टँक इंडिया सीझन १ च्या जज पण होत्या

कोण कोणत्या देशातील उद्योजिकांचा यादीत समावेश

यात शिपिंग, रियल इस्टेट आणि निर्मिती क्षेत्रातील महिलांचा समावेश आहे. यात ऑस्ट्रेलिया, चीन, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, जपान, सिंगापुर, दक्षिण कोरिया, ताइबान आणि थायलंड च्या उद्योजिकांचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने