'जॉन्सन अँड जॉन्सन' बेबी पावडरचा परवाना रद्द करणं योग्यच; सरकारचा दावा

 मुंबई : लहान मुलांच्या आरोग्यासाठी जॉन्सन अँड जॉन्सन पावडर हानिकारक असल्याचा ठपका ठेवत अन्न व औषध प्रशासनाने या उत्पादनावर बंदी आणली होती. त्यानंतर कंपनीने मुंबई हायकोर्टात धाव घेऊन कशाच्या आधारे बंदी आणली, तो अहवाल मागितला होता.कोर्टाने तो अहवाल कंपनीला उपलब्ध करुन देण्याचे सांगून राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता राज्य सरकारने जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी टाल्कम पावरड उत्पादनाचा परवाना रद्द करण्याच्या निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.



'ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षित उत्पादनांची निर्मिती आणि पुरवठा करणं ही कंपनीची जबाबदारी आहे. त्यामुळे बेबी टाल्कम पावडरच्या गुणवत्तेची खात्री होईपर्यंत उत्पादन आणि विक्री करता येणार नाही'' अशी ठाम भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. तसं प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेलं आहे.या बेबी टाल्कम पावडरच्या आणखी काही नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे का? अशी विचारणा करत राज्य सरकारला त्यावर 14 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता १४ तारखेच्या सुनावणीमध्ये काय होणार? याकडे लक्ष लागून राहिलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने