'कर नाही, तर डर कशाला'; राऊतांच्या धाडसाचं कौतुक करत उद्धव ठाकरेंचा बंडखोरांवर 'घाव'

मुंबईः शिवसेनेचे एक हाती लढवय्ये संजय राऊत १०३ दिवसानंतर तुरुंगातून बाहेर आले. यानंतर त्यांनी आज पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी मातोश्रीवर दाखल होत शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ठाकरेंसोबत पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ठाकरे यांनी राऊत यांच्या कुटूंबियाचं कौतुक करत केंद्रीय यंत्रणावर निशाणा साधला.




उद्धव ठाकरे काय म्हणाले?

संजय राऊत माझा जिवलग मित्र आहे. न्यायदेवतेचे मी आभार मानतो. निकालपत्रात परखडपणे मत नोंदवण्यात आले आहेत. संजय राऊतांच्या धाडसाच कौतुक. केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.केंद्रीय यंत्रणांचा दुरउपयोग करुन अनेक पक्ष फोडण्यात येत आहेत. हे सर्वकाही देश पाहत आहे. न्यायव्यवस्था अंकिता करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संकटाच्या काळा सोबत उभा राहतो तो खरा मित्र आहे. खोट्या केसमध्ये राऊत यांना पुन्हा अटक होऊ शकते. कर नाही तर डर कशाला. पळून गेलेल्यांनाही हा एक धडा आहे. संपुर्ण राऊत कुटूंबियांच कौतुक. न्यायालयानं केंद्र सरकारला काल दणका दिला आहे.

तसेच, न्याय देवताही आपपल्या अंकित करण्याची सुरुवात केंद्र करतात की काय अशी केंद्रीय कायदामंत्री रिजिजू यांची विधाने आहेत. सर्व सामान्यांच्या आशेचा किरण न्यायालय असतात. न्यायालय आपल्या बुडाखाली घेण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला विरोध केला पाहिजे. असे आवाहानही त्यांनी यावेळी केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने