Children's Day & Chacha Nehru Birthday: नेहरूंविषयी या आठ गोष्टी तुम्हालाही माहिती नसतील;

दिल्ली : लहान मुलांचे आवडते चाचा नेहरू आणि भारताच्या पहिल्या पंतप्रधानपदाचा मान मिळवणारे पंडित नेहरू यांची आज जयंती. जगभऱ्यात नेहरूंचे जीवनचरित्र असो वा मग त्यांचे किस्से किंवा त्यांचे नाव असो, प्रत्येकाला त्यांच्याविषयी माहिती आहे. मात्र पंडित नेहरूंच्या काही गोष्टी या बऱ्याचर लोकांना माहिती नाही. त्यांच्या वयक्तिक आयुष्यातील या काही गोष्टी वाचून तुम्हीही अवाक व्हाल.



जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी या गोष्टी तुम्हाला माहिती आहे काय?

लहान मुलांचे आवडते चाचा नेहरू आणि भारताच्या पहिल्या पंतप्रधानपदाचा मान मिळवणारे पंडित नेहरू यांची आज जयंती.

  • त्यांच्या या आठ गोष्टी कदाचित तुम्हाला ठाऊक नसतील. त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊयात महत्वाच्या गोष्टी

  • दंगलखोरांशी लढण्यासाठी नेहरूंनी पिस्तूल उगारली होती. हा प्रसंग आहे 1947चा.

  • नेहरू यांचे आजोबा गंगाधर पंडित दिल्लीचे शेवटते कोतवाल होते.

  • स्वातंत्रपूर्वीच्या काळात सगळेच नेते केवळ पांढरा सदरा घालायचे, नेहरू हे पहिले नेते होते ज्यांनी या सदऱ्यावर ‘जॅकेट’ चढविले. हेच पुढे ‘नेहरू जॅकेट’ म्हणून प्रसिद्धीस पावले.

  • तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की नेहरुंना १९५०-१९५५ या काळात सुमारे ११ वेळा शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते, परंतु त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार कधीही मिळाला नाही.

  • सिगरेट पिताना नेहरूंचा फोटो तुम्ही अनेकवेळा पाहिला असेल. त्यांचा सिगरेटचा सर्वात आवडता ब्रॅंड होता ‘555 सिगारेट’.

  • नेहरू हे कश्मिरी पंडित होते. त्यामुळे आपसूकच पंडिती अभ्यासाचे संस्कार त्यांच्यावर झाले होते. प्राचीन भारत, वेद, संस्कृत आणि अश्या प्रकारच्या साहित्यांचे त्यांनी अनेक वर्षे अध्ययन केले

  • अखंड भारताचे विभाजन हा भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमयी क्षणाला लागलेला काळा डाग होता. अनेक अभ्यासकांच्या मते फाळणी होण्याचे अप्रत्यक्ष श्रेय गांधीजी आणि पंडित नेहरुंना जाते.

  • कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच नेहरू मुस्लीम नेत्यांच्या संपर्कात आले होते. शेख अब्दुला १९३७ मध्ये कॉंग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांची मुस्लीम नेत्यांशी जवळीक अधिक वाढली.

  • २७ मे १९६४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने पंडित नेहरूंचा मृत्यू झाला. त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी १५ लाख लोक जमले होते. महात्मा गांधींच्या अंतिम संस्कारानंतर दुसऱ्यांदा एखाद्या नेत्याला निरोप देण्यासाठी भारतीय जनता एवढ्या मोठ्या संख्येने जमली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने