2024 मध्ये हरलो तर निवडणूक कधीच लढवणार नाही; माजी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

आंध्र प्रदेश : निवडणूक लढवण्याबाबत माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मोठी घोषणा केलीय. जर आमचा तेलगू देसम पक्ष 2024 च्या निवडणुकीत सत्तेत परत आला नाही, तर ही माझी शेवटची निवडणूक असेल, असं नायडूंनी जाहीर केलंय.बुधवारी रात्री उशिरा कुर्नूल जिल्ह्यातील रोड शोमध्ये भावूक झालेल्या माजी मुख्यमंत्र्यांनी टीडीपी सत्तेत येईपर्यंत विधानसभेत पाऊल न ठेवण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. चंद्राबाबू नायडू म्हणाले, "जर मला विधानसभेत परतायचं असेल, राजकारणात राहायचं असेल आणि आंध्र प्रदेशला न्याय द्यायचा असेल तर.. तुम्ही आम्हाला पुढच्या निवडणुकीत जिंकून दिल्यास, हे शक्य आहे. कारण, असं झालं नाही, तर ही माझी शेवटची निवडणूक असणार आहे."



चंद्राबाबूंनी लोकांना विचारलं, "तुम्ही मला तुमचा आशीर्वाद द्याल का? तुमचा माझ्यावर विश्वास आहे का?" यावेळी तिथं उपस्थित लोकांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वायएसआर काँग्रेस पक्षानं (YSR Congress Party) सभागृहात नायडूंच्या पत्नीचा अपमान केला होता. त्यावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यानं (चंद्राबाबू नायडू) 19 नोव्हेंबर 2021 रोजी ठराव केला की, त्यांचा पक्ष सत्तेवर आल्यानंतरच ते आंध्र प्रदेश विधानसभेत प्रवेश करतील. रोड शोमध्ये लोकांना आपल्या संकल्पाची आठवण करून देत चंद्राबाबू म्हणाले, जर आम्ही सत्तेत परतलो नाहीत तर पुढची निवडणूक आमच्यासाठी शेवटची असेल, असं त्यांनी जाहीर केलंय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने