कंत्राटी सफाई कामगारांचा ठिय्या

कोल्हापूर : सीपीआरमधील सफाई कामासाठी डीएम इंटरप्राईजेसला दिलेल्या ठेक्याची मुदत संपली असूनही अद्याप तीच कंपनी येथे काम करत आहे. अशा स्थितीत सीपीआर प्रशासनाने सफाई कामगारांना किमान वेतनावर कामावर घ्यावे, अशा मागणीसाठी कंत्राटी सफाई कामगारांनी ठिय्या आंदोलन केले. यात सर्व श्रमिक संघाचे अतुल दिघे यांनीही सीपीआर प्रशासनाशी चर्चा केली. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता रजेवर असल्याने समाधानकारक उत्तर मिळाले नाही तेव्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. या वेळी पोलिस व सफाई कामगारांत शाब्दिक चकमक झाली. अखेर सोमवारपासून धरणे आंदोलनाचा इशारा सफाई कामगार व श्रमिक संघाने दिला.



डीएमएम इंटरप्राईजेसकडे दीडशेवर सफाई कामगार आहेत. यापूर्वी डीएमसारख्या अन्य कंपन्यांनी ही येथे सफाई कामाचा ठेका चालवला होता. त्यांच्याकडे काम करणारे हे सफाई कामगार आहेत. गेल्या महिन्यात सफाई कर्मचाऱ्यांनी वेतन वाढ मागितली तेव्हा डीएम कंपनीच्या व्यवस्थापकांनी ठेका मुदत संपल्याचे सांगितले. त्यामुळे सफाई कामगारांनी काम बंद केले. तेव्हा डीएम कंपनीने अन्य कामगार जमा करून येथे काम सुरू ठेवले आहे. ठेका संपला असताना डीएम कंपनीकडून अद्याप काम कसे केले जाते. हे काम बेकायदेशीरपण कसे करतात असे प्रश्न उपस्थित केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठांताना भेटण्याची मागणी केली.

मात्र ते रजेवर असल्याने कर्मचाऱ्यांनी अधिष्‍ठाता कार्यालयासमोर ठिय्या मारला. अखेर सीपीआरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गिरीश कांबळे यांनी ठेका संपला असेल तर दुसऱ्या ठेकेदार नियुक्त करण्यासाठी कार्यालयीन प्रक्रिया असते. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून मंजुरी घ्यावी लागते. त्यामुळे त्याला काही काळ जाईल. मात्र अधिष्ठांताशी चर्चा करावी लागेल, असे सांगितले. यावर कर्मचाऱ्यांचे समाधान झाले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने