ब्लू टीकचा 'तो' निर्णय स्थगित; Twitter च्या मालकाचा यु-टर्न

अमेरिका : ब्लू टीकसाठी आता पैसे द्यावे लागणार असा निर्णय ट्वीटरने घेतला आणि त्यानंतर त्यावरून चर्चा सुरू झाली. थोड्याच दिवसांत आता पुन्हा हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे आता इलॉन मस्क आणि ट्वीटरच्या मनमानी कारभारावरुन टीकेला सुरुवात झाली आहे. सध्या ब्लू टीक सेवेचं आठ डॉलर्सचं सबस्क्रिप्शन रद्द करण्यात आलं आहे.



ट्वीटरने ट्वीटर ब्लू असं नवं फिचर सेवेत आणलं होतं. या नुसार, ब्लू टीक घेण्यासाठी आठ डॉलर्स मोजावे लागणार असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र बनावट खात्यांमध्ये वाढ झाल्याने ट्वीटरने ही सेवा तूर्तास स्थगित केली आहे. युजर्सकडून या ब्लू टीकचा गैरवापर केला जात असल्याचंही ट्वीटरने म्हटलं आहे. ज्यांनी आधी सबस्क्रिप्शन घेतलं, त्यांची सेवा सुरुच राहणार आहे.

काय आहे ही सेवा?

१. कोणत्याही पडताळणीशिवाय व्हेरिफाईड बॅज मिळणार

२. रिप्लाय, मेन्शन, सर्च या सेवांमध्ये सबस्क्रिप्शन घेतलेल्या युजर्सना प्राधान्य मिळणार

३. स्पॅम आणि स्कॅमपासून वाचण्यास मदत होणार

४. मोठे ऑडिओ, व्हिडीओ पोस्ट करता येणार

५. अर्ध्यापेक्षा जास्त जाहिरातींपासून या युजर्सची सुटका होणार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने