संमथा, वरुणनंतर दंगल गर्ल फातिमा शेखलाही झालाय ‘हा’ गंभीर आजार

मुंबई: फातिमा सना शेख हि बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. तिला दंगल  या चित्रपटाने वेगळीच ओळख दिली. मात्र ही अभिनेत्री एका आजाराशी लढत आहे. काळजी करु नका ती उत्तम आहे. फातिमाला एपिलेप्सी हा आजार आहे. नुकतच तिने तिच्या सोशल मीडियावर एपिलेप्सी या आजाराबद्दल पोस्ट केली होती.अभिनेत्री फातिमा सना शेख हिने एपिलेप्सीसोबतच्या तिच्या संघर्षाबद्दल आणि औषधोपचार आणि वर्कआउटच्या मदतीने ती स्थीती कशी हाताळली आहे याबद्दल बोलली. एपिलेप्सीशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तिने इंस्टाग्रामवरील AMA  सत्रात भाग घेतला. नोव्हेंबर हा एपिलेप्सी जागरूकता महिना म्हणून ओळखला जातो. फातिमा सना शेख या आजारकडे सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी आणि लोकांमध्ये याबद्दल जागृती करण्यासाठी सतत प्रयत्न करत असते.



एपिलेप्सीचा तिच्यावर व्यावसायिकदृष्ट्या कसा परिणाम झाला आणि एपिलेप्सीचा सामना कसा केला? याबद्दल, फातिमा म्हणाली, ' मी खूप भाग्यवान आहे. यात माझ्यासोबत माझं कुटुंब मित्रमैत्रिणी आणि तिचा पाळिव कुत्रा बिजली यांची साथ मला मिळाली. त्यामुळे मला हिंमत मिळते. मला 'दंगल'च्या ट्रेनिंगदरम्यान अचानक भोवलं आली आणि मी जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा हॉस्पिटलमध्ये हाते. मला सुरुवातीला काही कळलंच नाही. त्यानंतर मला  पहिल्यांदा या आजाराविषयी कळालं. पहिली पाच वर्ष मला हे मान्य करणं खूप कठिण होतं. आता मात्र आता मी ते स्वीकारलं आहे.'

फातिमा सना शेख या आजाराकडे सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी आणि लोकांमध्ये याबद्दल जागृती करण्यासाठी सतत प्रयत्न करतांनाही दिसते. फातिमाने तिच्यावर असलेल्या औषधांची नावे सांगितली नाहीत, कारण ती म्हणाली की, ‘प्रिस्क्रिप्शनशिवाय त्याचा सल्ला दिला जाणार नाही. मी कोणती औषधे घेत आहे हे मला सांगायचं नाही. कारण कोणीही माझे प्रिस्क्रिप्शन वापरु नये असे मला वाटते, ते सुरक्षित नाही. तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही केले पाहिजे.’ ती पुढे म्हणाली, ‘मला खूप स्थिर आणि बरं वाटत आहे.’सध्या तिच्या आगामी चित्रपट 'सॅम बहादूर'मध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात फातिमा सना शेख इंदिरा गांधींची भूमिका साकारताना दिसणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने