यूपी-बिहारसह 'या' राज्यांतील पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर; 8 डिसेंबरला लागणार निकाल

दिल्ली:  हिमाचल आणि गुजरात विधानसभा निवडणुका  जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर आता निवडणूक आयोगानं  पाच राज्यांतील पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. या जागांसाठी 5 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर गुजरात आणि हिमाचलसह 8 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.याशिवाय, ज्या भागात निवडणुका होणार आहेत तिथं आचारसंहिता लागू झाली आहे. समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यामुळं यूपीची मौनपुरी लोकसभा जागा रिक्त झाली. तिथं आता निवडणूक आयोगानं पोटनिवडणुकीची घोषणा केलीय. याशिवाय ओडिशातील पदमपूर, राजस्थानमधील सरदारशहर, बिहारमधील कुधनी, छत्तीसगडमधील भानुप्रतापपूर आणि यूपीमधील रामपूर इथं पोटनिवडणूक होणार आहे.



संपूर्ण वेळापत्रक पाहा

  • अधिसूचना तारीख – 10 नोव्हेंबर 2022

  • नामांकनाची अंतिम तारीख - 17 नोव्हेंबर 2022

  • नामांकन मागं घेण्याची शेवटची तारीख - 21 नोव्हेंबर 2022

  • मतदानाची तारीख - 5 डिसेंबर 2022

  • मतमोजणीची तारीख - 8 डिसेंबर 2022

हिमाचल-गुजरातमध्ये कधी होणार निवडणुका?

यावेळी हिमाचलमध्ये एका टप्प्यात निवडणुका होत असून त्याअंतर्गत 12 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर दुसरीकडं गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. 5 डिसेंबरला आणखी एक मतदान होत आहे. दोन्ही राज्यांचा निकाल 8 डिसेंबरला लागणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने