ज्या Bumble डेटिंग अ‍ॅपमुळे आफताब-श्रद्धाची ओळख झाली त्यांनीही मांडली बाजू, म्हणाले “सदस्यांच्या गरजा…”

दिल्ली: दिल्ली हत्याकांडातील मुख्य आरोपी आफताब पूनावाला याची Bumble या डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून श्रद्धाशी ओळख झाली होती. या घटनेनंतर त्यांनी आपल्याला धक्का बसला असल्याचं म्हटलं आहे. तसंच पोलिसांना लागेल ती मदत करण्यास आपलं उपलब्ध असल्याचंही सांगितलं आहे. आफताब आणि श्रद्धा याच डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले होते. कुटुंबाने विरोध केल्यानंतर श्रद्धा घर सोडून आफताबसह दिल्लीत आली होती. पण आफताब लग्नासाठी तयार होत नसल्याने त्यांच्यात सतत वाद होत होता. यातूनच आफताबने तिची हत्या करत मृतदेहाचे ३५ तुकडे केले.




“घटनेची माहिती मिळाल्यानंतर ‘बंबल’मधील सर्वांना धक्का बसला आहे. आम्ही सर्वजण श्रद्धा वालकर कुटुंबाच्या पाटीश आहोत”, असं बंबल अ‍ॅपच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. “आम्ही तपास अधिकाऱ्यांना गरज लागेल ती सर्व मदत आणि सहकार्य करण्यास तयार आहोत. आमच्या सदस्यांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे. त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आमची एक समर्पित टीम आहे,” असंही त्यांनी सांगितलं आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस बंबल अ‍ॅपच्या माध्यमातून आफताबची अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, श्रद्धाची हत्या केल्यानंतर २० दिवसांनी आफताब अ‍ॅपवर दुसऱ्या तरुणीला भेटला होता आणि तिला डेट करु लागला होता. इतकंच नाही तर श्रद्धाचा मृतदेह घरात असताना तो तिला दिल्लीमधील घरी घेऊन येत होता.

श्रद्धाच्या मोबाईलचं नेमकं काय केलं, तसंच मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरलेलं हत्यार यासंबंधी आफताब खोटी माहिती देऊन दिशाभूल करत असल्याचा पोलिसांना संशय आहे.चौकशीदरम्यान आफताब वारंवार त्याचा जबाब बदलत होता. आपण श्रद्धाचा मोबाईल महाराष्ट्रात फेकून दिला होता असं त्याने आधी सांगितलं होतं. नंतर मात्र त्याने दिल्लीत त्याची विल्हेवाट लावल्याचं सांगितलं. पोलिसांनी दिल्ली कोर्टाकडे आफताबची नार्को-टेस्ट करण्याची मागणी केली आहे.बंबलची स्थापना २०१४ मध्ये उद्योजक व्हिटनी हर्ड यांनी केली होती. ही अमेरिकेतील कंपनी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने