शिंदे यांनी भविष्य पाहिल्याच्या चर्चेवर केसरकरांनी दिलं स्पष्टीकरण

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल शिर्डी दौऱ्यावर असताना सिन्नरच्या मिरगावात ज्योतिष पाहायला गेले होते. त्यामुळे राज्यात पुन्हा वाद पेटलेला दिसून येत आहे. दरम्यान या गोष्टींवरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. तर आता या सर्व प्रकरणावर शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.



शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोशाळेला भेट दिली आहे. भविष्यवाणी पाहण्यासाठी नाही तर गोशाळेला भेट देण्यासाठी गेले होते. शिर्डी दौऱ्यावेळी सोबत असणारे शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.दरम्यान, मुख्यमंत्री ज्योतिष पाहायला गेले यावरून विरोधकांनी टीका केली तर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, 'एकनाथ शिंदे हे स्वतःचं भविष्य तयार करणारा माणूस आहे, मुख्यमंत्र्यांना भविष्य पाहण्याची काहीच गरज नाही. ते भविष्यकाराचे भविष्य सांगतील. कार्यकर्त्यांनी आग्रह केला म्हणून मुख्यमंत्री तिकडे गेले असतील. एकनाथ शिंदे हे स्वतःचं भविष्य तयार करणारा माणूस आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे ते कोणालाही भविष्य दाखवणार नाही, असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने