मोदी अन् बायडन कधीच करत नाहीत ड्रिंक्स; वाचा हिटलर कशाचा होता शौकीन

मुंबई: आपल्यापैकी अनेकांना कोणतं ना कोणतं ड्रिंक्स प्यायला आवडते. कुणाला दारू प्यायला आवडते तर, कुणाला कोल्डड्रिंक प्यायला आवडतं. मात्र, तुमच्या मनात कधी असा प्रश्न आला आहे का की, जगभरातील प्रसिद्ध नेते नेमकं कोण डिंक्स पितात किंवा त्यांना काय प्यायला आवडतं.आज आम्ही तुम्हाला जगातील अशाच काही नेत्यांबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यांना कोणते न कोणते पेय पिण्याची आवड आहे. यातील काही व्यक्ती बिअरच्या तर, काही व्यक्ती केवळ चहा पिण्याच्या शौकीन आहेत.संपूर्ण जगात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. त्यांच्या प्रत्येक गोष्टींची दखल घेतली जाते. त्यावर चर्चादेखील केली जाते. या सर्वामध्ये जर, तुम्हाला मोदी नेमक्या कोणत्या डिंक्सचे शौकीन आहेत असा प्रश्न पडला असेल तर, मोदी कोणत्याही प्रकारच्या मादक पेयाचे शौकीन नाहीत. मोदी केवळ चहाचे शौकीन आहेत.

मोदींशिवाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेनदेखील चहाचे शौकीन आहेत. तर, जगावर क्रूरतेचे राज्य करणाऱ्या हिटरललादेखील दारूचे व्यसन नव्हते मात्र, त्याला बिअर प्यायला आवडत होती. तर, साम्यवादी समकालीन युद्धादरम्यान पाणी प्यायचे मात्र, लोकांना वोडका पित असल्याचे सांगत असे. रूजवेल्ट आणि चर्चिल यांच्या दारूची मैत्री होती. दोघेही भयंकर मद्यपी होते.असे म्हटले जाते की, स्टॅलिन इतरजण नशेत असल्याचा फायदा घेत असे. नशेत असलेल्या व्यक्तींकडून सहकार्‍यांना माध्यमातून गुपित माहिती काढून घेत असे. तर, चर्चिल नशेत असताना काहीही बोलत असे.



दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल रुझवेल्टला झाली होती अटक

रुझवेल्ट यांची अमेरिकेतील सर्वाधिक मद्यपी राष्ट्राध्यक्षांमध्ये गणना होते. रुझवेल्ट यांच्या पाठोपाठ जॉन एफ. केनेडी आणि जॉर्ज डब्ल्यू. बुश सीनियर यांची नावे आहेत. सीनिअर बुश यांना दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल अटकही करण्यात आली होती.

मार्टिन ल्यूथर किंगचे दारू प्रेम

जग बदलणाऱ्या नेत्यांमध्ये मार्टिन ल्यूथर किंग यांचे बिअरप्रेम अवघ्या जगाला माहिती होते. तर, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प स्वतःला फक्त चहाप्रेमी असल्याचे सांगतात. एवढेच नव्हे तर, आपण कधीही दारूला हातही लावला नसल्याचे ट्रम्प सांगतात. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे देखील दारू पित नाहीत.

भारतातील कोणते नेते होते दारू प्रेमी

भारतीय नेत्यांमध्ये अटलजींना महागड्या दारूवर विशेष प्रेम होते असे सांगितले जाते. सुब्रमण्यम स्वामी यांनी अटलजींवर मद्यपी असल्याचा जाहीर आरोपदेखील केला होता. एवढेच नव्हे तर, 1997 मध्ये कुमुदम या तमिळ मासिकात त्यांनी याबद्दल लिहिलेदेखील होते. महात्मा गांधी त्यांच्या पुस्तकात लिहितात की, त्यांनीदेखील कधीकाळी दारूचे सेवन केले होते. गांधींना माता पुतलीबाईंनी दारू न पिण्याची शपथ दिली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने