कसं होईल जगाचं? फक्त ६ दिवसांत ८०० कोटींच्या पार होईल पृथ्वीची लोकसंख्या

मुंबई: वैज्ञानिक भाषेत सांगायचं झालं तर माणूस म्हणजे होमो सेपियंस आहोत. आपल्याला १०० कोटी वरून २०० कोटीपर्यंत पोहचण्यासाठी १२५ वर्ष लागले. पण ७०० वरून ८०० कोटींवर पोहचण्यासाठी फक्त १२ वर्ष पुरेसे ठरले. आता येत्या १५ नोव्हेंबरला जगभरातून लोकसंख्या ८०० कोटींची संख्या पार करेल. अमेरिकेने याचं श्रेय विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, चांगले आरोग्य आणि भरपूर आयुष्य याला दिलं आहे.



लोकसंख्या वाढीचा दर गेल्या काही वर्षांपासून कमी झाला आहे. पण तरीही २०३७ पर्यंत आपली लोकसंख्या ९०० कोटी आणि २०५८ पर्यंत १००० कोटी होण्याची शक्यता आहे. याचा अनुमान UN DESA ची वर्ल्ड पॉपुलेशन प्रॉसपेक्ट्स २०२२ च्या रिपोर्ट मध्ये लावण्यात आला आहे.माता आणि शिशूंचा मृत्यू दर कमी होत असल्याने लोकसंख्येचा हा आकडा म्हणजे मैलाचा दगड ठरणार आहे. लोकसंख्या वाढीने नैसर्गिक संसाधनांची कमतरता जाणवू शकते. पण काही लोकांना याचा काहीच फरक पडत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने