'होय मीच जबाबदार'; 11 हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीनंतर झुकेरबर्गचा व्हिडीओ कॉल लीक

नवी दिल्ली - 'मेटा'कंपनीतून 11 हजार कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एका लीक व्हिडिओ कॉलमध्ये त्यांनी या कपातीसाठी स्वत:ला जबाबदार धरलं आहे. मेटाने कंपनीतील १३ टक्के कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे.




मार्क झुकरबर्गच्या व्हिडिओ कॉलच्या लीक रेकॉर्डिंगनुसार, या व्हिडिओ कॉलमध्ये झुकेरबर्गने कर्मचाऱ्यांना हटवण्यासाठी स्वत:ला जबाबदार धरलं आहे. या व्हिडिओ कॉलदरम्यान त्यांनी सांगितले की, ज्या लोकांना बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या, त्यासाठी मीच जबाबदार आहे, हे मला मान्य करायचे आहे.

कंपनीतून काढण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना १६ आठवड्यांचा बेस पे तसेच प्रत्येक वर्षाच्या सेवेचे दोन आठवडे बेस पे अतिरिक्त देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त सहा महिन्यांच्या आरोग्यसेवेच्या खर्चासाठीही कंपनी पैसे देणार आहे. अत्यावश्यक खर्च कमी करण्याची आणि पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत नोकरभरती थांबविण्याची योजना असल्याचे मेटाने म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने