दहशतवादानं भारताला दुखावण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्याविरुद्ध धैर्यानं लढलो - PM मोदी

दिल्ली:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'नो मनी फॉर टेरर' या आंतरराष्ट्रीय मंत्रिस्तरीय परिषदेचं उद्घाटन केलं. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  देखील उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ही परिषद भारतात होत आहे. अनेक दशकांपासून दहशतवादानं आपल्या देशाला दुखावण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्याविरुद्ध धैर्यानं लढलो, असं ते म्हणाले.



दहशतवादाचा (Terrorism) नायनाट होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. दीर्घकाळापासून दहशतवादाचा गरीब आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. मग ते पर्यटन असो की व्यावसायिक क्षेत्र. त्यामुळं लोकांची रोजीरोटी हिरावून घेतली जात आहे. दहशतवादाच्या आर्थिक मदतीच्या मुळावर आपण प्रहार करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, असंही मोदींनी स्पष्ट केलं.

यापूर्वी एनआयएचे महासंचालक दिनकर गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या परिषदेत सहभागी होणार नाहीत. याशिवाय, चीनकडूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. या परिषदेत 15 हून अधिक मंत्र्यांसह 73 देशांचे प्रतिनिधी सर्व मुद्द्यांवर खुलेपणाने चर्चा करतील. मग ते दहशतवादाचं स्रोत, धमक्या किंवा त्याचा निधी असो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर दहशतवादी फंडिंगसाठी केला जात आहे. भारताकडे याचे पुरावे आहेत, असंही गुप्तांनी सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने